बिबट्याने घरात शिरून महिलेला केले जखमी. #Attack

परीसरात भितीचे वातावरण.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील सामदा बिटातील वाघोली येथे गावात आज पहाटेच्या सुमारास बिबट ने पुन्हा तुळसाबाई म्हशाखेत्री या महिलेच्या घरात शिरुन खाटेवर असलेल्या तुळसाबाईवर हल्ला करीत तिला बाहेर खेचत आणले. व गंभीर जखमी केले. तिच्या आवाजाने घराशेजारी उठले आणि पाहते तर काय बिबट्या बाहेर पडत असल्याचे त्यांना दिसले.
बिबट्याने महिलेवर हल्ला करण्यापूर्वी 2 कोंबड्या वर ताव मारलेला होता. त्यामुळे परिसरातील लोक जमा होऊन आरडाओरडा केला असता बिबट तिथून पसार झाला.
     
       घटनेची माहिती वनविभाग ला देण्यात आली असता जखमी महिलेला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. एक आठवडाभरापूर्वी व्याहड बूज येथील महिलेला घरातून उचलून बाहेर नेऊन ठार केले होते. तसेच दोन दिवसांपासून सामदा येथे शेतकऱ्याला जखमी केले. आणि आज वाघोली येथे पुन्हा बिबट हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे . बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी गावातील नागरिकांनी यांनी केली आहे.
#Attack

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या