Top News

चिंतामणी महाविद्यालय गोंडपिपरी येथे वृक्षारोपण. #Plantation #gondpipari


(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
गोंडपिपरी:- मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार च्या वतीने नोव्हेबर २०१४ साली गावाच्या विकासासाठी सुरू केलेल्या उन्नत भारत अभियान योजना तसेच भारतात १-७ जुलै दरम्यान राबविण्यात येणारा वनमहोत्सव कार्यक्रम, यांच्या आंतर्गत स्वछता व वृक्षारोपनचा कार्यक्रम दि. 7 जुलै 2021 ला चिंतामणी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाद्वारे यशस्वीरित्य राबविण्यात आला. #Plantation #gondpipari
या प्रसंगी उन्नत भारत अभियान या योजनेचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. शरद एन. लखेकर यांनी योजनेचे व्हीजन, मिशन, आणि उद्दिष्टे व कार्य या विषयी विस्तृत अशी माहिती दिली. अध्यक्षणीय भाषनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. ए. निखाडे यांनी उन्नत भारत अभियान हि योजना शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील लोकसहभाग याच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी कश्याप्रकारे फायदेशीर आहे. यावर सखोल अस मार्गदर्शन केल. प्राचार्य डॉ. निखाडे वनमहोत्सव कार्यक्रमच्या निमित्याने, जागतिक हवामान तसेच औद्योगिक करणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून जास्तीतजास्त प्रमाणात झाडे लावून पर्यावरणाला वाचवण्याचा संदेश दिला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्य पूर्ण करण्याकरता रसायनशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. महेंद्र डी. अक्कलवार व सहकारी प्रा. उमेश वरघने आणि प्रा. पूनम चंदेल या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व काही निवडक विद्यार्थ्याचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. वरघने तर आभार प्रा. अक्कलवार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने