🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

स्व. गजानन गोरंटीवार यांच्या जन्मजयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे दर्शन गजानन गोरंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण व छत्र्या वाटप. #Plantation #Umbrella

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्याचे नेते, तथा शहराचे माजी नगराध्यक्ष स्व. गजाजनजी गोरंटीवार यांच्या जन्मजयंतीदिनी त्यांच्या सेवेला व कार्याला उजाळा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे वृक्षारोपण व छत्र्या वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

🍾चंद्रपूर शहरात काल देशी दारू दुकानाचे थाटात उद्घाटन!
👇👇👇👇👇👇
http://www.adharnewsnetwork.com/2021/07/chandrapur-alcohol.html

भारतीय जनता पार्टी च्या वतीने विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत १ जुलै ला स्व. गजाजनजी गोरंटीवार यांच्या जयंती निमित्ताने त्यांचे पुत्र कु. दर्शन गजानन गोरंटीवार यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण व कर्मचााऱ्यांना छत्र्या वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संतोष कुंभरे, भाजपा महामंत्री राजू मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मामीडवार, लॅब टेक्नीशियन डुकरे सर, आरोग्य कर्मचारी, परीचालिका, महेंद्र कामिडवार, संतोष चलाख, संतोष पेंदोर, आदी उपस्थित होते.