आरोपी सह चोरीस गेलेल्या 4 मोटारसायकल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भदावली:- भद्रावती पो स्टे भद्रावती येथे मोटार सायकल चोरीचे ४ गुन्हे नोंदु असुन दिनांक २.७.२०२१ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीर कडुन बातमी मिळाली की, काही दिवसापुर्वी पंचशिल वार्डात चोरी गेलेली मोसा हि आरोपी नामे प्रशांत शुधांशु मलीक, वय १९ वर्षे, रा फुकट नगर, भद्रावती यांनी चोरी केली आहे. अशा खबरेवरुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याचे मित्र रितीक अशोक जांभुळकर, वय २१ वर्षे, रा डोलारा तलाव, भद्रावती, प्रज्वल बबन बुरानकर, वय १९ वर्षे, रा फुकट नगर, भद्रावती व विधीसंघर्ष बालक रोहन विनोद सोळंके,१७ वर्षे रा फुकट नगर, भद्रावती, प्रशांत मंगेश ताटेवार वय १७ वर्षे रा फुकट नगर, भद्रावती यांनी मो सा क एम एच ३४ बी जे ६४३८ कि अ २५,०००रू, मोसा क एम एच ३२ एन ७७५३ कि अ ३०,००० रु. मोसा क एम एच ३४ बी इ ९१४३ कि अ ७०,००० रू, मोसा क एम एच ३४ ओ डब्ल्यु ६१८१ कि अ २५,००० रू असा चोरी केला आहे. त्यावरून सदर आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हयात चोरी केलेल्या ४ मोसा कि अ १,५०,००० रु च्या जप्त करण्यात आलेल्या आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा., अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उप वि.पोलीस अधिकारी निलेश पांडे सा., यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार, पोशि केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार, सचिन गुरनुले यांनी केली.
#police
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत