रस्त्यावर अपघातामुळे मृत्यु होणाऱ्या प्राण्यांनबद्दल जनजागृती.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- वाहतुकीची वर्दळ असणार्या रस्त्यांवर अपघाताने मृत्यु होणार्या प्राणी व पक्ष्यांच्या बाबतीत जनजागृती करण्याकरिता तेलंगानातील दोन सहासी युवकांनी मंचेरीयल ते वारानसी सायकल प्रवास सुरू केला असुन नुकतीच त्यांनी भद्रावती येथे भेट दिली.
तेलगंनाचा मंचेरीयल येथील फेंन्डस यॅनीमल ट्रस्ट चे कार्यकर्ते पदम संदेश गुप्ता व बेली गंडुला नरेश या दोन युवकांनी सेव लाईफ सेव नेचर या ध्येया अंतर्गत लोकांनमध्ये जनजागृती करण्याकरिता मंचेरीयल ते वारानसी हा दोन हजार पाचशे कि. मी. अंतर प्रवास सायकलने करण्याचे ठरविले. या दोन युवकांनी दि.27 जुन रोजी हमली वाडा येथील श्री हनुमान शिर्डि साई मंदिर येथे दर्शन घेवुन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांचा मते वाहनांचा धडकेमुळे रस्त्यावर जनावरे किंवा पक्षी मरुन पडतात. या जनावरांना किंवा पक्षांना तेव्हाच कोणीही उचलून त्यांची विल्हेवाट लावत नाही. त्यामुळे मागुन येणार्या दुसर्या वाहनाला त्याचा ञास होतो. शिवाय त्या मृत प्राण्याचा किंवा पक्षाचा कुजल्या शिरीराचा दुर्गंधी मुळे इतर वाहन चालकाला ञास होतो. तसेच मृत प्राण्याचा कुजलेल्या शरिरामुळे रोग जंतू चा प्रसार होवुन लोकांचे आरोग्य धोक्यात येते.
त्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. सज्जन वेक्तीने अशा मृत प्राणी किंवा पक्षांना उचलून रस्त्याच्या बाजूला खड्डा करून पुरावे. शासनाने सुध्दा रस्त्यावर अपघातामुळे मरून पडणार्या प्राणी किंवा पक्षांना त्वरीत उचलण्या करिता स्वतंञ विभाग निर्माण करावा. या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याकरिता मंचेरीयल ते वारानसी हा सायकल प्रवास करण्यात येत आहे. हा प्रवास ते पंचेचाळीस दिवसात पूर्ण करणार आहे.
#Bicycletravel