Click Here...👇👇👇

प्रकल्पग्रस्तांना नौकरी व मोबदला तात्काळ द्या- डाॅ. अंकुश आगलावे #Projected

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- वेकोलिव्दारा अधिग्रहित
जमीनीचा मोबदला व नोकरी प्रकल्पग्रस्तांना तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय मानवाधिकारी संगठन नवी दिल्ली चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ. अंकुश आगलावे यांनी वेकोलिच्या बैठकीत केली.
   वेकोलितील एकोणा वाढीव क्षेत्रात अंदाजे 2000 एकर जमीन शेेतक-यांची अधिग्रहित केलेली आहे. त्यात सेक्शन 9 लागून 6 महिण्यांचा कालावधी लोटूनही 60 टक्के लोकांना जमीनीचा मोबदला मिळाला आहे. अजूनपावेतो 40 टक्के शेतकरी प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नौकरी पासून वंचित ठेवल्या गेले आहे. शेेतक-यांच्या जमिनी बळजबरीने कब्जा करून त्यांना मोबदला व नौकरी दिली गेलेली नाही. 
      वेकालिव्दारे प्रशासनाव्दारे प्रकल्पग्रस्तांचे कागदपत्रे आॅनलाईन व आॅफलाईन पध्दतीने घेतले जाणार तसे ग्रामपंचायत मार्फत गावांमध्ये शिबीर लावून नोकरी संदर्भातील कागदपत्रे घेणार असल्याची माहिती दिली. सिंचित जमीनीचा मोबदला  देखिल उपविभागीय अधिकारी यांचेसोबत बैठक घेवून निर्णय घेतला जाईल व योग्य मोबदला दिला जाणार असल्याचे आश्वासन क्षेत्रीय महाप्रबंधक यांनी दिले. 
      वेकोलिव्दारे एकोणा, माजरी वाढीव क्षेत्रातील जमीनी अधिग्रहित करणार तसेच  पाटाळात सेक्शन 9 लावून  आर.आर. पाॅलीसी व सी.बी. अॅक्ट प्रमाणे नोकरी देण्याचाही प्रस्ताव पाठविणार असल्याचे वेकेालिने प्रशासनाने बैठकीत सांगितले. एकोणा वाढीव क्षेत्रात  2 महिन्याच्या आत उर्वरीत शेेतक-यांचे मोबदला व नौकरी देण्याचे आश्वासन वेकोलि प्रशासनाव्दारे दिले आहे. तसेच कोंढा हरदाळा ब्लाॅक सी.बी आॅक्ट प्रमाणे अधिग्रहित करून मोबदला देणार असल्याचे बैठकीत सांगितले.
सदरील बैठक हंसराजजी अहीर, पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली झाली व या बैठकीत डाॅ. अंकुश आगलावे यांनी वेकोलितील प्रकल्पग्रस्तांना त्वरीत मोबदला व नौकरी देण्याची आग्रही मागणी केली. #Projected