तहसील कार्यालयातील सुविधा पूर्वरत करा. #RajuraTahsil

Bhairav Diwase
युवासेना राजुऱ्याचे तहसीलदाराला निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- परिसरातील सर्वात मोठे तहसील कार्यालय असलेल्या राजुरा शहरातील तहसील कार्यालयात सुविधांचा अभाव आहे. तहसील कार्यालयात विविध कामानिमित्य तालुक्यातील शेतकरी, मजूर,आणि कष्टाकरी जनता त्याठिकाणी येते.
परंतु कार्यालयीन परिसरातील उघड्या नालीमुळे वृद्ध नागरिकांना त्रास होतो. तसेच कार्यालयातील मुत्रीघर बंद असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना बाहेर लघुशंका करावी लागत आहे.
या सर्व समस्यांबाबत युवासेना राजुऱ्याच्या वतीने शहर सरचिटणीस स्वप्नील मोहुर्ले यांच्या नेतृत्वात तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी युवासेनेचे तालुकाप्रमुख बंटीभाऊ मालेकर, शहर प्रमुख पंकज बुटले, युवासेना कार्यकर्ते शुभम भोयर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.#RajuraTahsil