Top News

राकाँतर्फे कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचा सत्कार. #Reporter


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १८ जुलै रोजी गडचांदूर येथील राकाँ जनसंपर्क कार्यालय येथे पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सभापती तथा राजूरा विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे हे होते तर प्रमूख पाहुणे म्हणून गडचांदूर न.प.उपाध्यक्ष तथा राकाँ तालुकाध्यक्ष शरद जोगी,राकाँ जिल्हा महासचिव रफी़क निझामी यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना शाल, श्रीफळ व पेन भेट देऊन सत्कार करण्यात आला. #Reporter
   पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजात घडत असलेल्या घडामोडींना पत्रकार बांधव आपल्या लेखणीतून जनतेपुढे मांडत असतात.समाजात पत्रकारांना वेगळे स्थान आहे. पत्रकारांची लेखणी दिन दुबळ्यांना न्याय,हक्क मिळवून देण्यासाठीची असावी. मात्र हल्ली काही पत्रकार सत्यता न पडताळता केवळ समोरच्याला लक्ष करून बातम्या प्रकाशित करीत असल्याची खंत व्यक्त करत पत्रकाराची लेखणी निष्पक्ष,निस्वार्थ, निडरपणे जनतेपुढे सत्यता मांडणारी असावी.हे गूण ज्याच्यात आहे तोच खरा पत्रकार असे मौलिक मत अरूण निमजे यांनी आपल्या शैलीत अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले.तसेच आजच्या काळात काही अपवाद वगळता शोध पत्रकारीता संपुष्टात आल्याचे दिसून येते आहे.हल्ली निवडक पत्रकारच फक्त निष्पक्ष व निडरपणे लेखणीचा वापर करीत असल्याचे दिसत असून बातमीच्या मागची बातमी जो शोधून काढतो,माझ्या मते तोच खरा पत्रकार असे परखड मत निझामी यांनी मांडले.मी आणि माझ्या संघातील इतर सहकारी पत्रकार नेहमी दोन्ही बाजूंची पडताळणी करून पुराव्यासह कुणाच्याही दबावाखाली न येता बातमी लिहित असतो.आजपर्यंत कुणालाही लक्ष केले नाही आणि पुढे पण करणार नाही.खऱ्याला खरा,खोट्याला खोटा म्हणण्याचा आमचा स्वभाव असल्याचे मत कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सै.मुम्ताज़ अली यांच्यासह गणेश लोंढे,मयुर एकरे,प्रविण मेश्राम,प्रविण ठाकरे,अतुल गोरे,सतीश बिडकर या पत्रकार बांधवांनी व्यक्त केले.पत्रकार गौतम धोटे यांचीही यावेळी उपस्थिती होती.सदर कार्यक्रमात केवळ ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांचीच उपस्थिती होती हे मात्र विशेष.
🟥
         सदर कार्यक्रमात जिल्हा सचिव प्रवीण काकडे,जिल्हा उपाध्यक्ष,सुनील अर्कीलवार,युवक शहराध्यक्ष आकाश वराठे,अल्पसंख्यांक शहाध्यक्ष आसिफ किडीया,विद्यार्थी युवक शहराध्यक्ष महावीर खठोड,युवक शहर सचिव वैभव गोरे,तालुका उपाध्यक्ष करण सिंग,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुनीर शेख,शहर कार्याध्यक्ष सतीश भोजेकर, शहर सचिव सदू गिरी,उपाध्यक्ष सलीम शेख,आसिफ शेख,रोहन कुळसंगे,प्रफुल मेश्राम,गणेश पेंदोर यांच्यासह इतर राकाँ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.संचालन प्रवीण काकडे तर आभार सदू गिरी यांनी व्यक्त केले.
🟥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने