🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहिमेची सिंदेवाही तालुक्यातील गावागावात सुरुवात. #Sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील सर्व जनतेला कळविण्यात येते की शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्याभरात 'संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम व नियमित सनियंत्रण कार्यक्रम' माहे जुलै 2021 ते माहे ऑक्टोबर 2021 या दरम्यान पहिली फेरी राबविण्यात येत असून सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेवक, इत्यादीच्या सहकार्याने घरोघरी तपासणी करून क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर ग्रा. रुग्णालयात, प्रा. आ. केंद्रात पाठवण्यात येईल. #Sindewahi
तालुक्यातील सर्व जनतेनी तपासणी करिता स्वयंसेवक व कर्मचारी, आशा वर्कर यांना सहकार्य करावे. असे आवहान डाँ. प्रफुल सुने तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. तसेच श्री. प्रकाश मामीडवार , श्री. विलास साखरे, श्री. पराग बनकर इत्यादींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत