जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

(RPF)आरपीएफच्या ताब्यात असलेल्या युवकाचा मृत्यू. #RPF

घातपात कि हत्या? उच्चस्तरीय चौकशीची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- बल्लारपूर स्थानकात कार्यरत दक्षिण आरपीएफच्या ताब्यात चोरीचा आरोपाखाली असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे राहणारा अनिल गणपत मडावी वय २९ या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडीस आली आहे. आरपीएफच्या ताब्यात असलेल्या युवकाचा मृत्यू कसा झाला? कोणी मारलं? किंवा कोणत्या रोगाने मृत्यू झाला का? हे सीआयडीच्या चौकशीनंतर या रहस्यावरून पडदा उठणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील अनिल गणपत मडावी यास सुमारे पंचवीस हजारांच्या तांबे केबल चोरीच्या प्रकरणात सोमवारी दुपारी आणण्यात आले होते. सोमवारी रात्री ८.०५ वाजता तो आरपीएफच्या चौकीमध्ये हाताच्या दुखापतीने बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्याला तातडीने बल्लारपूर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र इथल्या डॉक्टरांनी त्यांना गंभीर पाहून चंद्रपूर दवाखान्यात रेफर केले. चंद्रपूरच्या डॉक्टरांनी रात्री १० वाजता अनिल मडावी यांना मृत घोषित केले.
मृतकाच्या कुटुंबीयाने सांगितले कि रात्री १० च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहेत. आमचा मुलगा मागील पाच दिवसापासून दिसला नाही. तो कुठे होता. हे माहीत नाही. आम्ही त्याचा शोध घेत होतो. मात्र, विरुर रेल्वे पोलिसांकडून आधी आम्हला कुठलीही माहिती दिली नाही. याबाबत उचस्तरीय तपास करण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहेत.
तेलंगणा राज्यातील आरपीएफ पोलीस स्टेशन सिरपूर कागजनगर येथे असून बल्लारपूर येथे चौकी असून दक्षिण रेल्वेच्या मालमत्तेची हानी आणि चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम दक्षिण आरपीएफ करते. आज या दक्षिण आरपीएफच्या चौकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविद साळवे, बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटिल यांनी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची चौकशी सीआयडीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहेत.
#RPF

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत