Top News

अखेर 'त्या' मृतकाची ओळख पटली. #Identificationdeceased



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील नवीन बसस्थानकासमोर दि.२४ जून रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास स्विफ्ट डिझायर या कारच्या धडकेत ठार झालेल्या अज्ञात इसमाची अखेर तब्बल १८ दिवसानंतर ओळख पटली आहे.


प्राप्त माहितीनुसार, दि.२४ जून रोजी रात्री ८.१५ वाजताचे सुमारास भद्रावती येथील नवीन बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात इसमास स्विफ्ट डिझायर कार क्र.एम.एच.३१, डी. सी. ३३९७ ने धडक दिल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. पोलिस लगेच घटनास्थळी गेले असता तो अज्ञात इसम गंभीर जखमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच त्या इसमाला रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचे निधन झाले. गुन्ह्याचा तपास केला असता ती कार दुर्गापूर येथील असल्याची व कार चालक भारतभूषण मोहन झाडे (२९) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र अज्ञात मृतक इसमाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनीच मृतकाचे अंत्यसंस्कार करुन टाकले. मृतकाची ओळख पटविण्याकरीता पोलिसांनी सर्व प्रयत्न केले.परंतू दोन आठवडे लोटुनही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही.अखेर या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. मुळे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून पत्रकारांना माहिती देताच विविध वृत्तपत्रांत त्या घटनेची बातमी झळकली. 
दरम्यान, दि.१२ जुलै रोजी मृतकाच्या पत्नीच्या ओळखीच्या महिलेने भद्रावती येथे कार अपघातात एक अज्ञात इसम ठार झाला व त्याची ओळख अद्याप पटली नाही अशा आशयाची बातमी वृत्तपत्रात वाचली. ही बातमी त्या महिलेने मृतकाच्या पत्नीस सांगितली. लगेच मृतकाची पत्नी आणि तिचे नातेवाईक यांनी भद्रावती पोलिस स्टेशन गाठले. तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुळे यांना भेटून मृतकाची छायाचित्रे बघितले असता मृतक इसम आपलाच नातेवाईक असून त्याचे नाव प्रकाश सोनबा रामटेके (५३) रा. आंबेडकर नगर, बाबुपेठ, चंद्रपूर असल्याचे सांगितले.
प्रकाश रामटेके हे दि.२२ जून पासून बेपत्ता होते. याबाबत चंद्रपूर येथील रामनगर पोलिस स्टेशनमध्ये कुटुंबियांनी तक्रारही दाखल केली होती.
#Identificationdeceased

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने