विवाहित महिलेची विष प्राषण करून आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. २९ जुलै 2021 रोजी सकाळच्या वेळी जामतुकूम येथे घडली. सौ.अर्चना संदिप शिंदे ( वय २४ ) वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. #Suicide
दि.२९ जुलै 2021 ला सकाळी शुल्लक कारणावरून अर्चनाने विष प्राशन केले. तात्काळ तिला पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्रो तिचा मृत्यू झाला. आज तिच्यावर जामतुकूम येथे अत्यंसंसकार करण्यात आले तिच्या मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.