🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विहिरीत उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या. #Suicide


पोंभुर्णा:- शेतकऱ्यांची आत्महत्या ही बाब नाविन्यपूर्ण राहिली नसली तरी अशा आत्महत्या घडताना पाहून समाजमन ढवळून ढवळून निघत आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नयेत म्हणून सरकार विविध योजना व उपाय करीत आहे. तरीही मात्र शेतकरी आत्महत्या ची मालिका थांबता थांबेना अशी झाली आहे.
#Suicide
पोंभूर्णा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या वेळवा माल येथील शेतकऱ्याने आपल्याच शेतातील तुडूंब भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. बंडू बाबुराव लोणारे वय अंदाजे 54 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू लोणारे यांनी रात्री दहा ते अकरा वाजता चे दरम्यान विहिरीत उडी घेतली असावी असा अंदाज वर्तवून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोंभुर्णा पोलिसांना होताच वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन तुडुंब भरलेल्या विहिरीतून पाणी बाहेर काढून मृतदेह काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सकाळ पर्यंत विहिरीतील पाणी कमी झाले नव्हते. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास विलंब लागत आहे.
     
      मृत शेतकऱ्याच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली,जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार असून घरचा कमावता व्यक्ती हरपल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.