Top News

राजुरा येथे ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीची सभा संपन्न. #meeting



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा - ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्णीत ईपीएस 95 निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेची सभा राजुरा येथील नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात नुकतीच संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक तुळशिराम बनवाडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती चे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र मुसळे, जिल्हा सहसचिव अरूण जमदाडे, पुंडलिक मोहुर्ले उपस्थित होते.
देशातील विविध महामंडळ, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्रात काम केलेल्या सुमारे 67 लाख ईपीएस-95 पेंशनधारकांना केवळ 300 ते 3 हजार रूपयापर्यंत पेंशन मिळते. त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. अशा स्थितीत सन्मानपूर्वक जगण्यास अडचण निर्माण होत आहे. या सर्व सेवानिवृत्त पेंशनधारकांना योग्य न्याय मिळावा व त्यांना योग्य प्रमाणात पेंशन मिळावी याकरीता ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती बुलढाणा चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनात सन 2017 पासून विविध मोर्चे, उपोषणांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय श्रम मंत्री यांना वेळोवळी निवेदने सादर करूण आपल्या हक्कासाठी आंदोलने सुरू केली आहे. हे आंदोलन अजून प्रबळ व्हावे याकरीता राष्ट्रीय संघर्ष समितीच्या चंद्रपूर जिल्हा शाखेअंतर्गत राजुरा शाखेच्या वतीने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी सुरू केली असून या सभेत एस.टी. महामंडळातून सेवानिवृत्त झालेले अरूण जमदाडे यांना ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती चे जिल्हा सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
सभेला चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी सह परिसरातील एस.टी. महामंडळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, भुविकास बँके सह इतरही क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संभेला चांगलीच उपस्थिती दर्शविली.
याप्रसंगी बुलढाणा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात राजुरा शाखेच्या वतीेने सहभागी होण्यासह राजुरा शाखेची कार्यकारणी गठीत करणे, चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना भेटून त्यांच्यापर्यंत ही समस्या मांडण्याचे ठरविण्यात आले.
सभेला प्रभाकर कुंक्षिकांतवार, मधुकर इंगळकर, पंढरीनाथ पिसे, आत्माराम बोबडे, सुभाष शहा, अरूण लांडे, कवडू डेरकर, दशरथ इटनकर, मनोहर टाके, बि.ए. टीकले, मुर्लीधर बुलबुले, आनंदराव ताजणे, भाऊरावजी खोब्रागडे, सुधाकर चौधरी सह इतर सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अरूण जमदाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शंकर जिवतोडे यांनी मानले.#meeting
🟥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने