बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार द्या; विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांच्या वतीने ब्रम्हपुरी तहसीलदारांना निवेदन. #Unemployedstudents

Bhairav Diwase
0


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या बेजबाबदार आणि कर्तव्यशून्य राज्यकारभाराचा फटका देशातील सुशिक्षित बेरोजगारांना बसत आहे,खाजगिकरणाचे धोरण अवलंबलेले केंद्र सरकारला आणि महाविकास आघाडी असे नाव धारण केलेल्या त्रिपक्षीय राज्य सरकारला झोपेच्या सोंगेतून जागे करण्यासाठी आम्ही ब्रम्हपुरी शहरातील सुशिक्षित बेरोजगार एक जण आंदोलन करून त्या माध्यमातून आपल्यापर्यंत आमच्या संविधानिक न्यायिक हक्कांच्या मागण्या आज शेकडोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढून या निवेदनाच्या माध्यमातून मागत आहोत,आमच्या न्यायिक हक्काच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.


1) सरळ सेवा पद भरती नव्याने सुरू करावी.
2) एमपीएससी व इतर परीक्षा नियमितपणे घ्यावीत.
3) 2010 पासून रखडलेल्या शिक्षक भरतीला मान्यता देऊन त्वरित पद भरती करावी.
  4)  आमदार व खासदार यांचे पेन्शन व इतर भत्ते रद्द करून त्या निधीचा वापर बेरोजगार भत्ता देण्यासाठी करावा.
     5) विविध सरकारी संस्थांचे होत असलेले खाजगीकरण थांबवावे व खाजगीकरण झालेल्या संस्थाचे पुनः राष्ट्रीयीकरण करावे.
       6) ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करावा व  एमआईडीसीची स्थापना करावी वरील आमच्या मागण्याचा सखोल अभ्यास करावा व आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावे अशी मागणी सुदामभाऊ राठोड जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य युवा आघाडी यांनी केले.
#Unemployedstudents

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)