शालेय विध्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू. #Death #water

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- कोरोनाच्या काळात शाळेला सूट्टी असल्यामुळे विध्यार्थी गुराखी बनले आहेत. कारण सुट्टी असल्यामुळे घरचे गुरेढोरे राखण करण्यासाठी शालेय विद्यार्थी जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र अशीच एका घटनेमुळे एका तरूण विद्यार्थ्याचा जीव गेल्याची घटना नागभिड तालुक्यातील पळसगाव(खुर्द) येथे आज 4:00 वाजताच्या सुमारास घडली. #Death #water
मृत्तक प्रियांशू अतुल मेश्राम (वय 18 वर्ष ) हा 12 व्या वर्गात शिक्षण घेत होता. घरच्या म्हैस राखण्यासाठी गावाशेजारी असलेल्या जगंल परिसरात इतर गुराखी मुलांसोबत आज गेला. 4:00 वाजताचे दरम्यान घराकडे येतांना तलावामध्य म्हैस घुसल्या त्याच्या मागोमाग सदर मुलगाही पाण्यात गेला. दरम्यान मृत्तकाला पाण्याचा अंदाज नसल्याने पाण्यातच बुडू लागला. यावेळी सोबतच्या मित्रानी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्याला वाचवू शकले नाही आणि त्यातच त्यांचा करून अंत झाला.
सदर घटनेची माहिती नागभिड पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व मृत्तकाचे प्रेत पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासनिसाठी रवाना करण्यात आले.
प्रियांशु हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा असून कुटुंबातील लाडका होता. त्याच्या जाण्याने कुटुंब व गावपरिसर शोकासागरात बुडालेला आहे. घटनेचा अधिक तपास नागभिड पोलीस विभाग करित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)