मुल तालुक्यातील खळबळजनक प्रकार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मुल तालुक्यात रस्त्याच्या बाजूला 16 गायी आणि बैल मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गायी मृताअवस्थेत परिसरात खळबळ उडाली आहे. #Death #mul
मिळालेल्या माहितीनुसार, मूल तालुक्यातील विरई ते गडीसुर्ला मार्गावर ही घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला 16 गायी आणि बैल मृतावस्थेत आढळून आले आहे. मृत जनावरांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. #Adharnewsnetwork
रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी ही जनावरे फेकली असावी असा स्थानिकांचा अंदाज आहे. ही मृत जनावरे कुठून आली आणि कोणी टाकली याबाबत अजूनही सुगावा मिळालेला नाही. मात्र, यामागे जनावरांच्या तस्करीचं कनेक्शन असल्याचा संशय आहे. मूल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.