Click Here...👇👇👇

पोलिस मदत केंद्रावर नक्षलवाद्यांकडून गोळीबार. #Firing

Bhairav Diwase
1 minute read

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बुर्गी पोलिस मदत केंद्रावर रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान पोलिसांनी लगेच सावध पवित्रा घेत नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. या घटनेला एसडीपीओ संकेत गोसावी यांनी दुजोरा दिला. #Firing #Adharnewsnetwork
सोमवारी असलेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून पोलिसांना लक्ष्य करत घातपात घडविण्याचा प्रयत्न केला, पण तो पोलिसांनी हाणून पाडला. या घटनेनंतर पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र करत नक्षलींची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.