चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार हे महानगरपालिकेच्या घोटाळ्याविरोधात 9 ऑगस्टला रणशिंग फुंकत आहे. कोरोना काळातील पालिकेचा कारभार, 200 कोटी लेखा परीक्षणात घोटाळा, कोरोना काळात सुद्धा नवी कार, वाहनाला VIP क्रमांक, अमृत योजना अश्याया विविध विषयांवर 9 ऑगस्टला आमदार जोरगेवार आंदोलन करणार आहे. #Chandrapur
आमदारांच्या या आंदोलनाला भाजपा उत्तर देण्यासाठी पुढे आली आहे, नागरिकांना 200 युनिटच्या भूलथापा यावर आमदार जोरगेवार यांच्या विरोधात भाजपचे 9 ऑगष्टलाच घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. पलिका सत्तेतील भाजपा व आमदार जोरगेवार हे एकमेकांविरोधात आंदोलन करणार आहे. #adharnewsnetwork