चंद्रपुर जिल्ह्यातील दुकानें आज पासून रात्री 8 पर्यत सुरु. #Chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपुर:- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर, मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी संदर्भ क्र . 08 चे आदेशान्वये , संदर्भ क्र . 06 चे आदेशातील सद्यस्थितीत स्तर -3 मधील लागू असलेल्या निबंधामध्ये खालील प्रमाणे केलेल्या सुधारणा चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दि . 03.08.2021 रोजीपासुन लागू करीत आहे. #Chandrapur

बारावीचा निकाल जाहीर.
http://www.adharnewsnetwork.com/2021/08/4-hscresult-result.html

सर्व संबंधीत प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी .

1 . सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना ( शॉपींग मॉल्स सह ) सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजेपर्यंत तसेच शनिवारी दुपारी 03.00 वाजेपर्यंत सुरु राहतील . सर्व दुकाने व मॉल्स ( अत्यावश्यक दुकाने वगळता ) रविवारी संपुर्णत : बंद राहतील .

2. सर्व सार्वजनिक उद्याने व क्रिडांगणे व्यायाम , चालने , धावणे , सायकलींग करीता सुरु राहतील .

3. सर्व शासकीय व खाजगी कार्यालये संपुर्ण क्षमतेने सुरु राहतील .

4. ज्या कार्यालयामध्ये यापुर्वी Work From Home पध्दतीने कामकाज सुरु होते ते यानंतरही सुरु

5 . सर्व कृषी विषयक कामे , बांधकाम , औद्योगीक प्रक्रिया , मालवाहतूक पुर्ण क्षमतेने सुरु राहतील.

6. व्यायामशाळा , योगा केंद्र , केस कर्तनालय , ब्युटीपार्लर , स्पा इ . आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजेपर्यंत तसेच शनिवार रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह वातानुकूलित यंत्राच्या वापराशिवाय सुरु ठेवता येतील . सदर सेवा ( आस्थापना ) रविवार रोजी संपुर्णत : बंद राहतील .

7 . सर्व सिनेमागृहे , नाटयगृहे , मल्टीप्लेक्सेस ( सिंगलस्क्रीन तसेच मॉल्स यामधील ) पुढील आदेशापावेतो बंद राहतील .

8 . जिल्हयातील सर्वधार्मीक / प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील .

9 . शाळा व महाविद्यालयाकरीता राज्य शिक्षण / उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील.

10. सर्व उपहारगृहे ( Restaurants ) सोमवार ते शुक्रवार दुपारी 04.00 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने Dining साठी कोरोना वर्तणुकीविषयक नियमांचे पालन करुन सुरु राहतील . तथापी दुपारी 04.00 ते रात्री 09.00 वाजेपर्यंत केवळ पार्सल / Take Away / घरपोच सुविधा सुरु राहतील . तसेच शनिवार व रविवार Dining साठी पुर्णपणे बंद राहतील व केवळ पार्सल सुविधा / Take Away / घरपोच सुविधा सुरु राहतील.

11. कोणत्याही नागरीकांस रात्री 09.00 ते सकाळी 05.00 या वेळेत बाहेर पडण्यास प्रतिबंध राहतील .

12. गर्दी टाळण्याकरीता वाढदिवस साजरा करणे, राजकीय / सामाजिक / सांस्कृतिक कार्यक्रम , निवडणुक , निवडणुक प्रचार , मेळावे , निषेध मोर्चे यावरील निबंध पुर्ववत राहतील .

13. सर्व कोरोना वर्तणुक विषयक नियम जसे की , मास्कचा वापर करणे , सामाजिक अंतर राखणे , वारंवार हात धुणे इत्यादी नियमांचे काटेकोरपणे. पालन करणे प्रत्येक नागरीकांस बंधनकारक असेल सदर आदेशात नमुद नसलेल्या बाबी या संदर्भ क्र. 06 च्या आदेशानुसार कायम राहतील . तसेच सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती , संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा , 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता , 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा , 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कार्यवाही संबंधीत पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच इतर संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी करावी .
सदर आदेश संपुर्ण चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दिनांक 03.08.2021 पासुन पुढील आदेशापावेतो लागू राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)