Top News

पंचायत समिती पोंभूर्णा कार्यालयातर्फे वृक्षारोपणाचे शुभारंभ. #Treeplantation


पोंभूर्णा:- पर्यावरण संतुलीत ठेवण्याचे संकल्प घेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत वृक्ष लागवड करण्याचे जिल्हा परिषदेच्या प्राप्त सुचनांच्या अनुषंगाने पोंभूर्णा तालुक्यात पंचायत समिती पोभूर्णा तर्फे 30 जुलैपासुन वृक्ष लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक 30 जुलै 2021 ला तालुक्यातील 6 ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. #Treeplantation
सदर वृक्षारोपन कार्यक्रमास पंचायत समिती च्या सभापती अल्का आत्राम यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपसभापती ज्योती बुरांडे व पंचायत समिती चे सदस्य गंगाधर मडावी, विनोद देशमुख हे सुध्दा सदर वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपन केलेत.
   सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास पंचायत समिती च्या गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे ह्या उपस्थित राहुन वृक्षारोपन कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी केली. सदर कार्यक्रमास कुझेकार विस्तार अधिकारी पंचायत समिती पोंभूर्णा, येरमे सहा. कार्यक्रम अधिकारी पोंभूर्णा सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यगण व सर्व सचिव, ग्राम रोजगार सेवक उपस्थित राहून सर्वोतोपरी सहकार्य करुन आजचा वृक्षारोपणाचा यशस्वी करण्यात आला. तसेच पोंभूर्णा तालुक्यातील सर्वच ग्रामपचंयतीमध्ये लवकरच वृक्ष लागवड कार्यक्रम पुर्ण करण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने