अखेर......! दुसऱ्याही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. #Leopards

Bhairav Diwase

(संग्रहित छायाचित्र)

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील व्याहड बूज, वाघोली बुटी, सामदा या परिसरात गेल्या आठवड्या भरा पासून बिबट हा चांगलाच धुमाकूळ घालत असून या बिबट ने व्याहड बूज येथील गंगुबाई रामदास गेडाम या महिलेला घरातून बाहेर काढत तिला ठार केले तसेच वाघोली बुटी येथे तुळसाबाई बाबुराव म्हशाखेत्री या महिले वर हल्ला करून गंभीर जखमी केले तसेच सामदा येथे विठ्ठल गेडाम या शेतकऱ्याला जखमी केले होते. #Leopards

🐆अखेर.....! बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश.
👇👇👇👇👇👇
http://www.adharnewsnetwork.com/2021/07/leopards-forestdepartment.html

त्यामुळे ह्या बिबट जेरबंद करण्यासाठी वनविभाग सावली यांनी 6 पिंजरे लावले मात्र बिबट हा हुलकावणी देत होता मात्र आज सायंकाळी बिबट त्या पिंजऱ्यात प्रथम घटना स्थळी डोंगरी जवळ अडकला व आज दिनांक 3 ला पहाटे च्या सुमारास पुन्हा एक बिबट जाळ्यात अडकला आहे.सावली वनपरिक्षेत्र चे कर्मचारी हे पावसात आपले कर्त्यव्य बजावत असल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.