Click Here...👇👇👇

पोंभुर्णा तालुका ग्रामसेवक संघटनेचे आज धरणे आंदोलन. #Gramsevak

Bhairav Diwase
1 minute read

वरोरा येथील ग्रामसेवकास मारहाण प्रकरण.

आरोपींना तात्काळ अटक करा:- ग्रामसेवक संघटना.
पोंभुर्णा:- गावाच्या विकासात मोलाचे सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांवर हल्ली हल्ले वाढले असून राजकीय दबावही वाढलेला पहावयास मिळत आहे. मूल तालुक्यातील बेंबळा येथील ग्रामविकास अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा वापर करून धमकीवजा पत्र दिल्याने वातावरण तापले असतानाच जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील ग्रामसेवक गोपीचंद नथुजी खांनेकर यांना मारहाण झाली आहे. या घटनेचा ग्रामसेवक संघटनांनी सर्वत्र निषेध नोंदविला असून आज दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी पंचायत समिती पोंभूर्णा येथे सर्वच ग्रामसेवक काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहेत. #Gramsevak
आरोपी विठ्ठल नथुजी जोगी व जयदेव यादव लगाने यांच्यावर गुन्हा नोंद झाला असला तरी ते मोकळे फिरत असल्याने त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी हे धरणे आंदोलन होणार आहे. असे संघटनेचे अध्यक्ष भूपती मसराम सचिव युवराज कुनघाडकर यांनी कळविले आहे.