(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- ब्रम्हपुरी वन विभागा अंतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र / नियातक्षेत्र सिंदेवाही मधील मोठा जाटलापूर गावच्या पादंन रस्त्यालगत बिबटच्या दोन पिलांचा मृत्यु झाल्याची घटना आज दि. ०४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ६ - ३० वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली.
माहिती मिळताच वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व श्री बंडू धोतरे, NTCA चे प्रतिनिधी तसेच श्री. विवेक करंबेळकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रम्हपुरी हे तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. मृत पिलांचे शव शवविच्छेदनासाठी डॉ. सुरपाम पशुवैद्यकीय अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही, डॉ. संतोष गवारे पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही व डॉ. पराग खोब्रागडे पशुधन विकास अधिकारी नवरगाव, याना पाचारण करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे सदर चमूने बिबटच्या पिलांचे शव विच्छेदन केले.
शवावरील जखमा व आसपास वाघाच्या पाऊलखुणा यावरून सदरील पिलांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तथापि शवविच्छेदन अहवालावरून पिलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. शवविच्छेदानंतर उपस्थित सर्व वनाधिकारी, कर्मचारी NTCA चे प्रतिनिधी व मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी यांचे समक्ष बिबटच्या पिलांचा मृत शरीराचे दहन करण्यात आले.#AnimalDeath