Top News

अमित गुंडावार यांची भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती. #Selection



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमित चंद्रकांत गुंडावार यांची भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
‌ही नियुक्ती भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली. अमित गुंडावार यांना धार्मिक आणि सामाजिक कार्यात विशेष आवड असून ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भाजयुमोचे जिल्ह्याचे पदाधिकारी राहिले आहेत. ते लोकमान्य विद्यालयाचे संचालन करणा-या लोकसेवा मंडळाचे सदस्यही आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल आ.सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री हंसराज अहीर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार अॅड.संजय धोटे, जिल्हा भाजपाध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर राखी कंचर्लावार, जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, ब्रिजभूषण पाझारे, नगराध्यक्ष ऐतेशाम अली, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, गोपालराव ठेंगणे, अनिल बगडे यांनी अभिनंदन केले आहे.#Selection

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने