राष्ट्रवादी काँग्रेस कोरपना तालुका अध्यक्षपदी सुहेल अली यांची नियुक्ती. #Appointment

Bhairav Diwase

कोरपना:- कोरपना येथील नगरसेवक म्हणून कार्य केलेले शिक्षित धडाडीचे युवा कार्यकर्ते म्हणून सोहेल अली यांची कोरपना तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितिन भटारकर यांनी नियुक्ती केली यावेळी वैभव गोरे आकाश वऱ्हाटे संदानंद गिरी मयूर एकरे आसीफ किडीया आदित्य मासीरकर प्रविण जाधव विकास टेकाम उपस्थीत होते सुहेल याच्या नियुक्तीने युवकामध्ये उत्साह संचारला आहे. #Appointment
    तालुक्याचे ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेस युवकाच्या गळयात अध्यक्षपदाची संधी दिली आहे राष्ट्रवादी कॉग्रेसचे संपर्कमंत्री ना, प्राजक्त तनपुरे जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वैद्य युवक राष्ट्रवादी अध्यक्ष नितिन भटारकर महीला अध्यक्ष बेबीताई उईके विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे  तालुकाराष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरद जोगी यांचे आभार मानले आहे यावेळी सुहेल  यांनी समाजाच्या अखेरच्या घटकाचा  कल्याण व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ध्येयधोरणानुसार .२०% राजकारण ८०% समाजकारण हे पवारसाहेबाच्या धोरणानुसार युवकाच्या संघटन बांधणी व पक्षाचे कार्यक्रम राबविण्यावर अधिक प्राधान्य देऊ असे मत व्यक्त केले.