देशी कट्टा बाळगणाऱ्यास अटक. #Arrested

Bhairav Diwase

एक पुस्तुल व चार जिवंत कारतूस जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- स्थानिक गुन्हे शाखेने देशी कट्टा बाळगणा-या एका व्यक्तीला गोपनीय माहितीच्या आधारे शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या मागिल टॉवर टेकडी परिसरातून जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक देशी बनावटीची पिस्तोल व चार जिवंत कारतूस जप्त केले आहे. #Arrested
स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्तीवरील पथकास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली की, सागर येलपावार, रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपुर चे मागील टॉवर टेकडी परिसरात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र(पिस्तोल) घेऊन फिरत आहे. अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तीवरील पथक तात्काळ ठिकाणी रवाना झाले. #Adharnewsnetwork
सदर ठिकाणी पोहचताच रात्रीचे 1.30 वाजताचे सुमारास एक इसम टॉवर टेकडीकडुन येणारे कच्च्या रोडने अंधारात एकटाच चालत येताना दिसला. संशय आल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव सागर संतोष येलपावार, वय 21 वर्षे, रा. महावीर नगर, त्याचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल (माऊझर) व चार जिवंत कारतुस आढळून आले.
त्याचे अंदाजित मुल्य 32,000/- रुपये आहे. मिळालेले देशी पिस्तोल व चार जिवंत काडतुस ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 855/21 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर करीत आहे.