भद्रावतीत डेंगू मोहिमेला सुरुवात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती परिसरातील घाण व अस्वछतेमुळे डेंगू, मलेरिया सोबतच विविध रोगांची उत्पत्ती होत असून अस्वछता हेच विविध रोगांचे माहेरघर आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिवारात स्वच्छता राखून रोगांना आपल्यापासून दूर सारण्याचे आवाहन भद्रावती नगर पालिकेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.#Adharnewsnetwork
भद्रावती शहरात डेंगू तथा मलेरियाचा प्रकोप मोठया प्रमाणात वाढत आहे.यावर आवर घालण्यासाठी भद्रावती नगर पालिकेतर्फे दि. 30 ऑगस्ट पासून जनजागृती मोहीम व त्यावर उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून या मोहिमेची सुरुवात शहरातील घुटकाला प्रभाग क्र.6 पासून करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर,उपाध्यक्ष संतोष आमने, नगरसेवक विनोद वानखेडे,चंद्रकांत खारकर,प्रफुल चटकी,सुधीर सातपुते, सरिता सूर,लक्ष्मी पारखी, शोभा पारखी, रेखा कुटेमाटे, प्रतिभा सोनटक्के ,लीला ढुमणे,प्रतिभा निमकर, शीतल गेडाम,अनिता मुळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याधिकारी पिदूरकर यांनी आठवड्यातून एक तरी दिवस कोरडा पाळावा व या दिवशी कोणतेही भांडे तथा पात्रात पाणी साठवून न ठेवता कोरडी ठेवावीत. असे आवाहनही त्यांनी यावेळी शहरातील नागरिकांना केले.
याप्रसंगी या प्रभागात डास नाशक फवारणी, डासनाशक धुरांड्याची फवारणी ,प्रभागात असलेल्या कचऱ्याची कापणी करून परिसर स्वच्छ करण्यात आला.ही फवारणी शहरातील प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी डेंगू तथा मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.#Campaign