बल्लारपूर तालुक्यातील कवडजी येथे भव्य गौशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न. #Ballarpur

Bhairav Diwase
0


बल्लारपूर:- सद्गुरु जगन्नाथ बाबा ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था कवडजी ता. बल्लारपूर यांच्या वतीने आज दिनांक 31.08.2021 रोज मंगळवार ला दुपारी 12.16 मिनी. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर संभाजी बोबडे यांचे घरहदितील खुल्या जागेवर गौशाळेचे उद्घाटन पार पडले.

या कार्यक्रमाला सोमेश्वर पदमगिरीवार उपसभापती पं.स बल्लारपूर यांनी फलकाचे फित कापून उद्घाटन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक सद्गुरु खेमराज पावडे महाराज (पिपरी कायर) व सद्गुरु वामन पावडे महाराज ( हिरापूर) यांनी गऊ मातेचे पूजन केले. त्यावेळी त्यांचे सहकारी मंडळी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालीक पेंदाम (सरपंच कवडजी), डॉ गराड (पशुवैद्यकीय अधिकारी). श्रीकांत ठवरे  (कृषी पर्यवेक्षक बल्लारपूर) घनश्याम टाले ( कृषी सहायक कवडजी). हरीश जगन्नाथ ढवस  ( आष्टा), मुरलीधर जगन्नाथ ढवस (आष्टा), विकास शंकर पिदुरकर ( चेक खापरी), पानघाटे सर ( गडचांदुर), नंदाताई देरकर ( गदचांदुर), रामदास जेऊरकर ( वणी), पुर्शोतम  परकंडे (मानोली), रवींद्र भाऊराव वासाडे ( आमडी) गौरव ठेंगणे (चंद्रपूर) उपस्थित होते.


संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रशेखर संभाजी बोबडे, उपा.सुरेखा परकंडे, स. दत्ताजी गावंडे, स सचिव धनश्री चंद्रशेखर बोबडे , कोषाध्यक्ष आशा वासाडे, सदस्य मनोहर बोबडे , सदस्य शेषराव बोबडे, व सर्व गावकरी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाचा आस्वाद घेऊन करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)