भद्रावतीत सुरू असलेल्या अवैध धंदयांना तात्काळ आळा घाला- डाॅ. अंकुश आगलावे #Bhadrawati

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदयांना आळा घालण्याची मागणी केंद्रीय मानवाधिकार संगठनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ. अंकुश आगलावे यांनी मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचेकडे निेवेदनातून केली आहे.
शहर व ग्रामीण भागात गांजाची मोठया प्रमाणात विक्री होत आहे. यामध्ये अल्पवयीन मुले-मुली गांजाचे नशा करण्यात गुुंतले असून त्यांचे भविष्यात धोक्यात आलेले आहे.
भद्रावती शहरातील रेल्वे स्टेशन जवळील भाग, गवराळा टेकडी, पिंडोनी स्मशान भुमी, मल्लारा तलाव स्मशान भुमी, शास्त्री नगर येथील निर्माणाधीन अंगणवाडी, विजासन टेकडी येथील दगडाची खाण असलेल्या विविध परिसरात मोठया प्रमाणात गांजाचे सेवन करतांना अल्पवयीन मुले व मुली आढळून आले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदी उठविल्यापासून ठिक ठिकाणी सट्टा व्यवसाय सुरू झाले आहे. तसेच प्रतिबंधीत तंबाखु गुटखा विक्रीचीही संख्या दिवसेेंदिवस वाढत चालली आहे. भद्रावती शहर व ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदयांना आळा व प्रतिबंध घालण्याची मागणी यापुर्वीही सामाजिक संगठन, शहरातील नागरिकांनी केलेली आहे.#Bhadrawati