जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भद्रावतीत सलुन दुकानाची तोडफोड, दिड लाखाचे नुकसान. #Pressconference

गुंडागर्दी केल्याचा सलुन मालकाचा पञपरिषदेत आरोप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- आपण दुकानात असतांना शटर बंद करून आपणास माराहान करून आपल्या दुकानाची तोडफोड केल्याचा आरोप येथील आंबेडकर नगर मधील सलुन व्यवसायी विलास वाटेकर यांनी पञपरिषदेत केला.
पञपरिषदेत विलास वाटेकर यांनी सांगितले की, सन 2005 पासून सूर्यकांत गौरकार यांचा गाड्या मध्ये माझे सलुन चे दुकान होते. दि 4 ऑगस्ट2005 रोजी चाळिस हजार गौरकार यांना पगडी दिली. तसेच दर महिन्याला 1500 रूपये किराया म्हणून दिला. परंतु आता कोरोनाचा काळात सलुन व्यवसायाची परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खालावल्या मुळे मी गौरकार यांना किरायाचे पैसे देऊ शकलो नाही. त्यामुळे सूर्यकांत गौरकार यांनी दहा ते बारा गुंडप्रव्रतीचे मिञ आणून मला शटर बंद करून मारहाण करुन सामानाची फेकाफेक केली व तोडफोड केली. त्यात माझे अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाले. या घटनेची मी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला गेलो असता अगोदर पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही. नंतर घेतली व मला शंभर रूपयाचा स्टॅंप पेपर आणायला पाठविले. तो पर्यंत त्या दहा बारा जनांचा टोळक्याने दुकानाची नासधूस करून ठेवली होती. करोना मुळे आधिच आपली आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने आपणास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही विलास वाटेकर यांनी पञपरिषदेत केली.


----------------------------------------------
भद्रावतीत गुंडागर्दी सहन केली जानार नाही-- साबिया देवगडे
गुंडागर्दि करून विशाल वाटेकर यांचा सलुन चा दुकानाची नासधूस करण्यात आली. त्यामुळे विलास वाटेकर यांचा रोजी रोटिचा प्रश्न निर्माण झाला असुन अशी गुंडागर्दि करणार्यावर शासनाने कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीवादि महिला काँग्रेसचा शहर अध्यक्षा साबिया देवगडे यांनी पञपरिषदेत केली. कोरोनाचा प्रादूर्भाव असल्यामुळे अनेक सलुन चालकांचे व्यवसाय डबघाईस आले असुन त्यांचावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आजचा जो प्रकार घडला तो निषेधार्थ असुन या घटनेचा मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे निषेध करते. तसेच या प्रकरणात दुर्लक्ष करणारे पोलिस अधिकारी मस्के व पोलिस कर्मचारी विशाल बेलज्जलवार यांचाही मी निषेध करते. तसेच विलास वाटेकर या सलुन दुकानदाराला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करते असेहि त्या
म्हणाल्या.
पञपरिषदेला विलास वाटेकर, शितल वाटेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा तालुका अध्यक्ष दुर्गा बिश्वास, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा शहर अध्यक्षा साबिया देवगडे उपस्थित होते.


-----------------------------------------------
वाटेकर यांना मारहान केली नाही-- सूर्यकांत गोरकार
याबाबत सूर्यकांत गौरकार यांचाशी संपर्क साधला असता विलास वाटेकर यांनी मागिल आठ वर्षा पासून किराया दिला नाही. ते नेहमी अरेरावी करत होते. गौरकार यांची जागा मीच हडपुन टाकतो, असे ते नेहमी म्हणत होते. त्यामुळे आम्हाला हे पाहुल उचलावे लागले. आम्ही कोणालाही हात लावला नाही. या घटनेची आमच्याकडे विडिवो क्लिप सुध्दा आहे. माझ्या वडिलांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांचा दवाखान्याचा खर्च करण्याकरिता मला पैशाची अत्यंत आवश्यकता होती परंतु वारंवार पैशाची मागणी करूनही वाटेकर हे माझे किरायाचे पैसे देत नव्हते अशी प्रतिक्रिया दिली.
-----------------------------------------------
आम्ही योग्य कारवाई केली --ए. पी.आय. मस्के
     या संदर्भात प्रभारी ठानेदार ए.पी.आय. मस्के यांचाशी संपर्क साधला असता वाटेकर यांचा तक्रारी वरून गौरकार यांचावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.  वाटेकर यांनीच तिन महिने पर्यंत दुकान राहु द्यावे मी स्टॅंपपेपर वर लिहून द्यायला तयार आहे. असे म्हटल्यामुळेच आपण त्यांना स्टॅंप पेपर आणायला सांगितला होता. अशी प्रतिक्रिया ए. पी.आय.मस्के यांनी दिली.#Pressconference

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत