(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- गेल्या काही दिवसापूर्वी २-३ दिवस सतत आलेल्या मोठ्या पावसामुळे अमलनाला बांध पाण्याने पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झाले आहे. ओव्हरफ्लो पाहण्याकरिता जिल्ह्यातून दररोज शेकडो जण येत आहेत. #Adharnewsnetwork
त्यामुळे अमलनाला परिसरात पर्यटकांची वाढती संख्या बघता लोकांच्या सुरक्षेकरिता पोलिस बंदोबस्त ही लावण्यात आले होते. आज रविवारची सुट्टी असल्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक अमलनाला येथे फिरायला व पहायला आले होते. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचे ओव्हरफ्लोच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चंद्रपूर येथील काही मित्र नातेवाईकसह अमलनाला येथे पाण्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते. अचानक दोन लहान मुले पाण्यात बुडाल्याची आरडाओरड सुरू झाली. त्यांना वाचवण्याकरिता अनेक जण यांच्याकडे धाव घेतली असता चंद्रपूर येथील एका युवकाने ही त्यांना वाचवण्याकरीता पाण्यात उतरला होता. पण पाणी खोल असल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. मृतक युवकाचे नाव गोलू चट्टे वय २४ रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर असे आहे. लोकांच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनाम्याची कारवाई सुरू केले आहे.#Death