Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात विठ्ठल मंदिर प्रभागात सौ. संगीता खांडेकर यांच्‍या प्रयत्‍नाने १४ कोटीचे काम पूर्ण. #BJP



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- विठ्ठल मंदिर प्रभागात भारतीय जनता पार्टीच्‍या एकमेव नगरसेविका सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांच्‍या सततच्‍या प्रयत्‍नांमुळे व पाठपुराव्‍यामुळे या प्रभागात आतापावेतो १४ कोटी रुपयांचे विकासकामे पूर्ण झाले आहेत. या प्रभागात विविध पक्षाचे नगरसेवक आहेत. मात्र विकासाची वाहती गंगा प्रवाहीत करण्‍याचे एकमेव काम नगरसेविका सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांनी केले आहे.
स्‍थानिक विठ्ठल मंदिर वार्डातील नगरसेविका सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहीर, माजी आ. नानाभाऊ शामकुळे व महानगरपालिकेच्‍या माध्‍यमातुन अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. तसेच पालकमंत्री फंड सी.एस.आर., खनिज विकास निधी फंड या माध्‍यमातुन प्रभागात विकासकामांचा झंझावत सुरु आहे.#Adharnewsnetwork


या विकासकामांमध्‍ये खासदार निधीतुन १२ बोअरवेल आमदार निधीतुन १० बोरवेल तसेच महानगरपालिके तर्फे चार बोरवेल, ४ हायमासक लाईट, मुलांकरीता खेळण्‍याचे साहित्‍य व महिलांकरीता ग्रीनविल जीम, आमदार, खासदार निधीतुन ३ मोठे सभागृह आज घडीला जनतेच्‍या सेवेकरीता उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत. नुकतेच या प्रभागात सिमेंट रोडचे भुमीपुजन सुध्‍दा करण्‍यात आले. या भूमीपूजन सोहळयात नगरसेविका सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांनी आतापर्यंतच्‍या विकास कामांचा आढावा घेत विकास कामांचा झंझावत याहीपुढे असाच वेगाने सुरु राहील याची ग्‍वाही दिली. तसेच प्रभागात विकासाची कामे, विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात नियमितपणे करित राहू असेही त्‍या यावेळी म्‍हणाल्‍या.
यावेळी भूमीपूजन सोहळयास भाजपा मंडळध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवार, भाजपा ओबीसी जिल्‍हा आघाडी अध्‍यक्ष विनोद शेरकी, भाजपा नेते सुर्यकांत कुचनवार, रमेश भुते, सौ. रेणुका घोडेस्‍वार, श्रीहरी बनकर, संजय कुळसंगे, राजु जोशी, सुरेश तालेवार, ललित मुल्‍लेवार, धनंजय हुड, सुरेश भाकरे, नरेश पवार, प्रदिप पाटील, भारत माणुसमारे, साहेबराव इंगोले, अनिल बोरेकर, अशोक नवघडे, उमेश अवघडे, मनिष हुड, उमेश वांढरे, मीनाताई देशकर, सौ. रेखाताई ठाकरे, सौ. सुनंदाताई भेदोडकर, सौ. मालाताई काटकर, सौ. सुमित्राताई बोबडे, निर्मलाताई कांबडे, सौ. ज्‍योतीताई नागापुरे, सौ. छायाताई रागीट आदि उपस्थित होते. #BJP

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने