रेल्वेखाली कटून युवकाची आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

एक वर्षाच्या मुलाला मागे सोडुन घेतला जगाचा निरोप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आपल्या केवळ एक वर्षाच्या मुलाला मागे सोडून रेल्वेखाली कटून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना दि.१२ ऑगस्ट रोजी पहाटे वरोरा-भद्रावती मार्गावर असलेल्या दत्त मंदिरालगतच्या रेल्वे पटरीवर घडली. #Suicide
 नितीन दिवाकर कसारे (२९) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव असून तो भद्रावती तालुक्यातील वाघेडा या गावचा रहिवाशी होता. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि केवळ एक वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या मृत्युने वाघेडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. #Adharnewsnetwork 😘