मुधोली येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन. #Ranbhaji

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील मौजा मुधोली येथे कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. सदर महोत्सवाचे उद्घाटन क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मुधोलीचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे माजी समाज कल्याण सभापती तुळशीराम श्रीरामे, माजी सरपंच केशव जांभुळे,चंदनखेडा कृषी मंडळ अधिकारी पी.जी.कोमटी, कृषी पर्यवेक्षक एम.एस.वरभे, भामडेळीच्या सरपंच शामल नन्नावरे, प्रगतीशील शेतकरी सूर्यभान मानकर, भास्कर ढोणे, भास्कर बावणे, शेषराव बावणे, अरुण मानकर प्रभृती मंचावर उपस्थित होत. #Ranbhaji
महोत्सवात विविध रानभाज्या आणि त्यांचे औषधी गुणधर्म या विषयावर कृषी मंडळ अधिकारी कोमटी आणि कृषी पर्यवेक्षक वरभे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महोत्सवात रमेश बावणे, बंडू घरत, नागो घरत, विठ्ठल चौधरी, अरुण घरत, अधिकराव श्रीरामे यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावून रानभाज्या बद्दल माहिती उपलब्ध करून दिली. #Adharnewsnetwork
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहाय्यक आर. जी. तुमडाम यांनी केले. तर आभार कृषी सहाय्यक वाय. एन. शिंदे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी कृषी मित्र हनुमान राणे व हेमराज उरकांडे यांनी परिश्रम घेतले.