🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पतंजली योग समिती तर्फे गुणवंतांचा सत्कार. #Hospitality


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील पतंजली योग समिती तर्फे इयत्ता दहावी व बारावी मध्ये तालुक्यातून अव्वल राहिलेले विद्यार्थी व पतंजली परिवारातील सदस्यांचे पाल्य असलेले गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात नुकताच संपन्न झाला.
#Hospitality
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल धानोरकर होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव उपस्थित होत्या. यावेळी इयत्ता १२ वी मध्ये ९७ टक्के गुण प्राप्त करुन तालुक्यातून प्रथम येणा-या कु.आसावरी आत्माराम देशमुख आणि इयत्ता १० वी मध्ये ९८.८० टक्के गुण प्राप्त करुन तालुक्यातून प्रथम येणा-या कु. गुंजन राजकुमार लुनावत यांचा  सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भद्रावती शहरातील प्रत्येक शाळेमधून प्रथम येणारे विदयार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान, कला, वाणिज्य आणि  व्होकेशनल शाखेतून प्रथम येणारे विदयार्थी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच योगा परिवारातील गुणवंत विद्यार्थांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात एकूण ३० विदयार्थी सहभागी झाले होते. #Adharnewsnetwork
      🟥
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील वैद्य यांनी केले. सुत्रसंचालन अनंत आखाडे यांनी केले. तर आभार प्रकाश आस्वले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हरिश हरियानी, अनंत मते, शरद लांबे, संजय आस्वले, विपुल ठक्कर, रवी भोयर, प्रफुल जोगी, चंद्रकांत श्रीरामे,शेंडे, संजय बेलेकर, मनोज बांदूरकर, वासुदेव सातारकर, अभय उमरे, सुनीता अडबोल, सुनीता खंडाळकर,  कांबळे, मनिषा लोणारे, विभा बेहरे, सरिता सातपूते, उमरे ताई यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत