घुग्गूस व्यापारी संघटनेतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार. #police.

Bhairav Diwase

घुग्गूस पोलीस स्टेशन मधून चार पोलिसाची बदली.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्गुस येथील व्यापारी संघटनेतर्फे घुग्गूस येथून बदली होऊन गेलेले मनिषा जगताप, सुधीर मते, विनोद वाणकर व सचिन बोरकर यांचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. #Police
सहायक पोलीस निरीक्षक संजय सिंह व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे यांचे सुद्धा पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले. घुग्गूस व्यापारी संघटनेचे सचिव साजन गोहणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पोलिसांना २४ तास कामे करावी लागतात, दसरा, दिवाळी, पोळा, ईद, मोहरम, ख्रिसमस अशा त्योहाराची त्यांना सुट्टी मिळत नाही,मोर्चा,व आंदोलनात बंदोबस्त करताना जेवण तर काय पाणी सुद्धा मिळत नाही, कोरोना काळात चोवीस तास पोलिसांनी नागरिकांना व व्यापारी बांधवाना सेवा दिली. #Adharnewsnetwork
यापुढे नागरीक,व्यापारी व पोलीस बांधवांमध्ये असेच सहकार्याचे नाते राहावे म्हणून बदली होऊन गेलेल्या पोलिसांचा सत्कार करावा असे येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल गुप्ता यांनी ठरविले व त्याप्रमाणे घुग्गूस पोलीस स्टेशन येथे पोलिसांचा सत्कार करण्यात आला.यावेळी घुग्गूस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल गुप्ता, सचिव साजन गोहने,संघटक मुन्ना लोहानी,सदस्य गोविंदराव मदान,कोषाध्यक्ष शकील,निरंजन डंभारे,दिपक अनेजा,प्रकाश हजारे, शंकर नागपुरे,सोनू नंदवानी,राजु झाडें, मोनु, अनिलभाई, किरण पुरेली,मुस्तफा,व पुण्यनगरीचे प्रतिनिधी सुरेश खडसे, उपस्थित होते, संचालन शंकर नागपुरे तर आभार प्रदर्शन साजन गोहने यांनी केले यावेळी व्यापारी बांधव उपस्थित होते.