अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार. #Leopard #death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना आज दि.१३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता चंद्रपूर-नागपूर मार्गावर भद्रावती तालुक्यातील टाकळी गावाजवळ घडली. #Leopard #death
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.त्यांनी पंचनामा करुन मृत बिबटाचे शव शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठविले.सदर बिबट हा नर प्रकारचा असून तो रस्ता ओलांडत असताना त्याला वाहनाची धडक बसली असावी असा कयास बांधला जात आहे. #Adharnewsnetwork