🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

धारदार शस्त्राने वार करीत प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या. #Murder


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर पत्नीने थेट माहेर गाठलं, मात्र माहेरी तिचे संबंध दुसऱ्या युवकाशी जुळले, परंतु दुसऱ्या युवकासोबत सुद्धा भांडण झाले याचा राग मनात घेत त्या प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या घरी जात तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला यामध्ये विवाहित प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. #Murder
मृतक विवाहित महिला 28 वर्षीय पूजा रवींद्र सलामे हीचा विवाह चिखल परसोडी येथील बागडे नामक युवकासोबत झाला होता. मात्र नवऱ्याशी मतभेद झाल्याने पूजा ने नागभीड येथे असलेलं माहेर आली, काही दिवस माहेरी राहिल्यावर परसोडी येथील 25 वर्षीय युवक विवेक ब्रह्मदास चौधरी सोबत पुजाचे प्रेमसंबध जुळले. #Adharnewsnetwork
मागच्या महिन्यात पूजा व विवेक यांचं काही कारणावरून भांडण झाले होते, भांडणाचा निपटारा करण्यासाठी विवेक आज सकाळी पूजाच्या घरी आला, त्यावेळी पुजाची आई घराबाहेर गेली असल्याने विवेकने या संधीचा फायदा घेत पूजाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.
अचानक झालेल्या हल्ल्यात पूजा चा जागीच मृत्यू झाला, आरोपी विवेकने आपल्या प्रेयसीची हत्या केल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा कबूल केला.
नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोरवते यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत, मृतदेह शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले.
आरोपी विवेक वर कलम 302,452 भादवी सहकलम 3(2)(5) अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारीत 2015 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत