Top News

श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास राज्यस्तरीय व विद्यापीठस्तरीय पुरस्कार जाहीर. #Award

सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार तर प्राध्यापक गुरुदास बल्की यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- येथील श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास दादाजी बलकी यांना महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजना तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे,सोबतच राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाल राजुरा ला जाहीर झाला आहे.
तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२०-२१सुद्धा जाहीर झालेला आहे.#Adharnewsnetwork
प्रा. गुरुदास बलकी यांची श्री शिवाजी महाविद्यालयात नियुक्ती २०१६ मध्ये इतिहास विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून झालेली आहे, तसेच प्रा. बलकी हे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून २०१८ पासून कार्यरत आहेत. मागील तीन वर्षातील म्हणजेच २०१८-१९,२०१९-२०,२०२०-२१ या कालावधीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव व राष्ट्रभक्ती जोपासणारे अनेक उपक्रम घेतले. त्यामध्ये जलसंवर्धनासाठी जलव्यवस्थापन, जलपुनर्भरण, वनराई बंधारे, मतदान व मतदार जनजागृती साठी पथनाट्ये, जनजागृती रॅली, सिंगल युझ प्लॅस्टिक फ्री इंडिया साठी जनजागृती, तसेच एचआयव्ही एड्स जनजागृती उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम, सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा, तंबाखूमुक्ती तसेच नियंत्रणासाठी जनजागृती, सुदृढ भारत सक्षम भारत अंतर्गत कार्यक्रम, कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती, कोविड-१९ च्या काळात गरजूंना मोफत १२००० मास्क वितरण, तसेच सोशल मीडियावरून जनजागृती, स्वच्छता अभियान अंतर्गत बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय, तसेच राजुरा शहरातस्वच्छता मोहीम, वर्धा नदी स्वच्छता मोहीम असे विविध जागरूकता कार्यक्रम राबविले, सोबतच जिल्हास्तरीय युवक-युवती नेतृत्व विकास शिबिर, आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक कार्यक्रम घेतले.
प्रा. बल्की यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय विविध शिबिरात भाग घेतला, यामध्ये राष्ट्रीय एकता शिबिर रांची, गुवाहाटी, हजारीबाग, नागपूर या झारखंड, आसाम, महाराष्ट्र अशा विविध राज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठाचे व राज्याचे नावलौकिक केले, आव्हान-२०१९ शिबिरातही सहभागी झालेत, प्रा. बलकी यांनी ही राज्याचे नेतृत्व करत राष्ट्रीय, राज्यस्तरीय शिबिरात संघनायक म्हणून महाराष्ट्राचा संघ, विद्यापीठाचा संघ घेऊन रांची, गुवाहाटी आसाम, हजारीबाग झारखंड, आव्हान २०१९ नांदेड, पूर्व प्रजासत्ताक दिवस परेड नागपूर इथे सहभाग घेऊन एक भारत श्रेष्ठ भारत असे विविध उपक्रम राबविले. व महाराष्ट्र राज्याचा व गोंडवाना विद्यापीठाचे नावलौकिक केले.
२०२० या वर्षी राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन सुब्बई येथे केले यामधे संपूर्ण महाराष्ट्रातील २७७ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता, सोबतच दरवर्षी विशेष शिबिराच्या आयोजनांतून ग्रामीण भागात जनजागृती चे कार्य सुरू आहे, या सर्व उपक्रमाची दखल घेत या पुरस्कारासाठी प्रा. बलकी व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर ची निवड करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांच्या रासेयो प्रवासात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे रासेयो संचालक प्रा. डॉ. नरेश मडावी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, संस्थेचे संचालक मंडळ, महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, शिबिराच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका असलेले टेंबुरवाही व सुब्बई येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद गावातील नागरिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाविद्यालयातील आजी/माजी रासेयो स्वयंसेवक या सर्वांची मदत व सहकार्य मिळाले.#Award

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने