कृषी पदविकेच्या विद्यार्थ्यांसाठी धावले आ. मुनगंटीवार #Chandrapur #Amaravati

शिक्षण परिषदेची दुटप्पी भूमिका विद्यार्थ्यांना करतेय आत्महत्येस प्रवृत्त.

कृषी शिक्षण संचालकानी विद्यार्थ्यांना उपदेशाचे डोज देण्यापेक्षा आधी शिक्षक भरती करावी:- सोपान कनेरकर.

अमरावती:- कृषि तंत्र निकेतन २०१८-२०२१ बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषि पदवी या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषि तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अशा विद्यार्थ्यांना कृषि पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यानी दहावी च्या बेस वर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तेही पदवीला प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या शिक्षणाला खंड लागणार. #Chandrapur #Amaravati


सन २०१७-२०२० या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषि तंत्र निकेतन हा अभ्यासक्रम पूर्ण करुन कृषि पदवीच्या थेट दुसऱ्या व पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व सन २०१८-२०२१ या बॅचच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा समान आहे. तरीसुद्धा २०१८-२०२१ या बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषि पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे.प्रवेश माहिती पुस्तिकेत कृषि पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षात प्रवेश नसल्याची माहिती असली तरी काही कॉलेज नि विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका दिल्याच नाही व त्यांना भ्रमात ठेवून प्रवेश करून घेतले.

कृषि पदविका विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून सोपान कनेरकर हे त्यांचा मागणीवर ठाम आहे. कृषी पदविका विद्यार्थ्यांचा विषय पेटत चालला असून कृषी मंत्री व कृषि परिषद संचालक कौसडीकर हे विद्यार्थ्यांना घेऊन गंभीर नाहीत असा आरोप विद्यार्थी करत आहे. कृषी मंत्री व MCAER वर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोपान कनेरकर यांनी कृषी विद्यापीठ अकोला येथे ठिय्या आंदोलन करून विद्यापीठाला पदवी प्रवेशा साठी पाठपुरावा करून घेतला तसेच सोपान कनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला घेरून त्यांच्या कडून पण कृषी परिषदेला पाठपुरावा करून घेतला. तरी कृषि परिषद या विषयावर गंभीर नाही. दोन दिवसांपूर्वी नेवासा येथे एक विद्यार्थी उपोषणाला बसला होता त्याला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कृषी परिषद येथे विद्यार्थी गेले असता त्यांना उलट सुलट उत्तर देऊन परत पाठवले.

कृषी मंत्र्यांनी केलेल्या शुल्क कपातीचे आम्ही स्वागतच केले परंतु चहा पेक्षा कतली गरम असे कृषी परिषद संचालक कौसडीकर सध्या विद्यार्थ्यांशी वागत आहे. यांनी विद्यार्थ्यांना धमक्या आणि उपदेश देण्याऐवजी शिक्षक भरती करावी असेही सोपान कनेरकर म्हणाले. या विषयावर अनेक निवेदने देऊनही त्यांनी ते निवेदने वाचली की नाही याचाही प्रश्न पडला आहे. याविषयावर चर्चा करण्यासाठी आज सोपान यांनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व आर्थिक नुकसान याबाबत माहिती दिली. त्याची दाखल घेत सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांना थेट कॉल द्वारे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवून यावर दखल घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली. व कृषि मंत्र्यानी त्यांची दखल घेत यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत