जाहिरात... Advertisement... विज्ञापन


✌️

✌️


🎂

राष्ट्र निर्मितीच्या कार्याला ऊर्जा देणार युवा वॉरिअर्स अभियान:- जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर. #Chandrapur #YuvaWarriors


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- युवा वॉरिअर्स पदाच्या संयोजक पदासाठी प्रज्वलंत कडु, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, कृष्णा चंदावार, यश बांगडे यांची मंडळशहा नियुक्ती करण्यात आली आहे. #Chandrapur #YuvaWarriors
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने युवा वॉरिअर्स अभियानाच्या माध्यमातून जिह्यात सर्वत्र नवीन युवकांना पक्षाशी जोडायला सुरवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजयुमो चे जिल्ह्या महामंत्री प्रज्वलंत कडु तुकूम मंडळ, सुनील डोंगरे बाबूपेठ मंडळ, प्रमोद क्षीरसागर बाजार मंडळ, भाजयुमो उपाध्यक्ष यश बांगडे बंगाली कॅम्प मंडळ, भाजयुमो सचिव कृष्णा चंदावार सिव्हिल लाईन मंडळ या सर्वांची संयोजक पदी निवड करण्यात आलेली आहे. #Adharnewsnetwork
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार ( अध्यक्ष लोकलेखा समिती,माजी कॅबिनेट मंत्री ) हंसराजभैय्या अहिर ( माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री भारत सरकार ) भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे, चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोदजी कडू, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे, भाजपा संघटन मंत्री राजेंद्रजी गांधी, भाजपा महामंत्री ब्रिझभूषणजी पाझारे, महापौर सौ राखीताई कंचर्लावार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महिला अध्यक्ष सौ अंजलीताई घोटेकर, भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष तुमची निवड करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील युवा वर्ग मोठ्या संख्येने पक्ष संघटनेत सहभागी होऊन राष्ट्र निर्मित्याच्या कार्याला ऊर्जा देण्याचं कार्य करतील तसेच भारतीय जनता पार्टीच्या विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याकडून यशस्वी प्रयत्न होतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत