Click Here...👇👇👇

सोयाबीन पिकावरती लष्करी अळीचे आक्रमण. #Chandrapur

Bhairav Diwase



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- अळी, कीटक , पिकावरील रोग ही बाब शेतीव्यवसायामध्ये नेहमीची आहे परंतु दहा वर्षे पूर्वी लष्करी अळीने ज्याप्रमाणे आपल्या विभागातील संपूर्ण सोयाबीनची उभी पिके नष्ट केली होती त्याच प्रकारची लष्करी अळी यावर्षी नुकतीच पाहायला मिळत आहेत याचे सर्वेक्षण काही गावांमध्ये किसान पुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. #Chandrapur



क्षेत्रातील वाघेडा, धानोली, पिर्ली, जेना, धामणी, नंदोरी टाकळी या गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हि अळी आढळून आली आहे. रात्रीतून पूर्ण सोयाबीनचे प्लॉटचे प्लॉट नामशेष करताना दिसत आहे काही वर्षामध्ये एक - एक वा मध्ये लक्षात येत आहे की दहा वर्षापूर्वी ज्याप्रमाणे अळी आली होती त्याच प्रमाणे पुनरावृत्ती होते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे या समस्येकडे प्रशासन, कृषी विभाग व शासन यांनी सामूहिकपणे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांची हाती आलेले सोयाबीन पीक क्षणात नष्ट होऊन शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. #Adharnewsnetwork
आज पर्यंत सोयाबीन पिकावरील लष्करी अळीच्या संदर्भात शासनातर्फे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही बाजारपेठेमध्ये सोयाबीनच्या भावाला उच्चाकी असलेल्या दर पाहता व सध्याची सोयाबीनची उभी असलेली पिके पाहता या वर्षी शेतकरी हा सुखावतील असे वाटत होते परंतु वेळीच त्यावर उपाययोजना न झाल्यास हाती आलेले पीक जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे . सर्व शेतकरी बांधवानी तात्काळ अळीवर्गीय कीटकनाशकांची फवारणी करावी ही विनंती किसान पुत्र शेतकरी समूहाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांचे वतीने करण्यात येत आहे.