🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला. #Attack #Leopard


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- कर्तव्य बजावून परत येत असलेल्या विश्वास गिरसाळवे रा. विसापूर या पेपर मिल कामगारांच्या चालत्या बाईकवर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना पेपर मिल विसापूर छोटा गेट जवळ घटना घडली. #Attack #Leopard
विश्वास हा नेहमीप्रमाणे ड्युटी करून परत येत असताना अचानक दडी मारून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर चालत्या दुचाकीवर हल्ला चढवून त्याला खाली पाडले. जवळच त्याच्या मागे असलेल्या सहकारी यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पळून गेला. त्यामुळे त्याच्या जीव वाचला. या घटनेत त्याला हाताला बिबट्याची नखे रुतली व गाडीवरून पडल्याने त्याला चांगलाच मार बसला. त्याला रात्रीच येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तथा पेपरमिल सुरक्षारक्षक यांनी त्यांची भेट घेतली. व घटनेची माहिती दिली. #Adharnewsnetwork
या घटनेच्या दहा मिनिटांपूर्वी सुरेश धोटे या कामगारावर बिबट्याने झडप घातली होती. मात्र थोडक्यात बचावला त्याच्या मागे विसापूर येथील रहिवासी महेश आस्वले आपले आपल्या पत्नी व भाचीसह घरी परत येत असतांना त्याच्या टू व्हीलर गाडी कडे तो जाऊ लागला होता. त्याने प्रसंगावधान साधून आपल्या गाडीच्या हेडलाईटच्या लक्ष प्रकाश त्याच्या तोंडावर पाडला त्यामुळे तो बीबट घाबरून तिथून पळून गेला सुदैवाने जीवितहानी झाली नाही. #Chandrapur #Ballarpur

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत