💻

💻

वेगळे विदर्भ राज्य हेच अंतिम ध्येय:- ॲड वामनराव चटप. #Vidarbha


विदर्भ आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.

26 ऑगस्ट पासुन 120 तालुक्यात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन.

लोकांना आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- गेल्या 116 वर्षापासून वेगळ्या विदर्भ राज्याचा लढा सुरू असून वेगळ्या विदर्भाबाबात केंद्राची उदासीनता दिसून येत आहे. वेगळा विदर्भ हाच विदर्भातील नागरिकांच्या विकासाचा पर्याय असून वेगळे विदर्भ राज्य करणे हेच अंतिम ध्येय असल्याचे मत विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड वामनराव चटप यांनी व्यक्त केले. कोरपणा येथे स्व. भाऊराव पाटील चटप सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. #Vidarbha
9 ऑगस्ट क्रांती दिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना पर्यंत नुकतेच विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर येथे शहीद चौकात ठिय्या आंदोलन यशस्वी करण्यात आले. यात अनेकांना अटकही करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी आपले मुंडण करून सरकारचा तीव्र विरोध केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष वेधले गेले, परंतु सरकारला मात्र जाग आलेली नाही. #Adharnewsnetwork
तेव्हा येत्या 26 ऑगस्ट पासून विदर्भातील 120 तालुक्यात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी एड चटप यांनी सांगितले. या सभेला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, माजी समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, माजी सभापती रवी गोखरे, रमाकांत मालेकर, बंडू राजूरकर, पद्माकर मोहितकर, सत्यवान आत्राम, संजय येरणे, अविनाश मुसळे, कपिल इदे, देवा पडोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना चटप म्हणाले राज्यावर तीन लाख कोटी 47 हजार रुपयाचे कर्ज असून महाराष्ट्र राज्यात राहिलास विदर्भाचे नुकसान आहे. नागपूर करारानुसार शिक्षण व नोकरीत 23 टक्के वाटा विदर्भाला मिळायला पाहिजे, मात्र अजूनही तो न मिळाल्याने नोकऱ्यांचा प्रश्नही आता ऐरणीवर येत आहे. विदर्भात वीज, कोळसा, वनसंपत्ती असतानादेखील विदर्भातील जनतेला अडचणीचा सामना करावा लागत असून शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे.  
       
        सिंचनाचा अनुशेष भरुन निघालेला नाही 200 युनिट मोफत देणाचे आश्वासन देणारे राज्य शासन विसरलेले आहे. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी एड चटप यांनी दिला. कोरपना येथील स्थानिक बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून तालुक्यातील विदर्भवादी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी बंडू राजूरकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत