Top News

दहावी व बारावीचे वर्ग नियमित सुरू करा. #Classes

पुरोगामी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातुन मागणी


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- इयत्ता १० वी आणि १२ वी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची पहिली पायरी असल्याने कोविड चे नियम पाळून त्यांचे वर्ग नियमित सुरू करण्या संदर्भात पुरोगामी पत्रकार संघाद्वारे तहसिलदार राजुरा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.#Adharnewsnetwork
कोविड-१९ च्या महाप्रकोपामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असतांना शाळा महाविद्यालये ही बंद झालीत. त्यातच १० वी १२ वी चे वर्गही नियमाप्रमाणे बंद करण्यात आले. खाजगी शाळांनी आपली फी नियमित वसूल करण्यासाठी ऑनलाइन क्लासेस चे 'भूत' समोर करून शैक्षणिक सत्र सुरू केले. पण या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना किती शैक्षणिक लाभ होत आहे याची चौकशी केल्यास धक्कादायक माहिती समोर येईल. त्यातच महाराष्ट्राच्या गाव-खेड्यातील विद्यार्थ्यांची व्यथा गंभीर आहे. अनेक गावांत नेटवर्क नसते तर राज्यात आजही लाखो विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने हे विद्यार्थी शिक्षणा पासून वंचीत आहेत.
१० वी, १२ वी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची पायरी असली तरी वर्ग बंद असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. मुळात १० वी, १२ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बुद्धी चंचल असल्याने तथा त्यांच्यात पाहिजे त्या प्रमाणात वैचारिक प्रगल्भता निर्माण न झाल्याने वर्ग बंद असल्याचा मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक लिंक तुटल्याने गाव-खेड्यातील काही विद्यार्थी वाम मार्गाला लागल्याचे चित्र आहे.
       
सदर निवेदनातून ही गंभीर बाब राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. या बाबींचा विचार करता तसेच इयत्ता १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर कोविड-१९ चे सर्व नियम लागू करून १० वी, १२ वी चे वर्ग सुरू करावेत अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनाही सदर निवेदन प्रतिलिपीत सादर करण्यात आले.
यावेळी राजुरा तालुका पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत, घनश्याम मेश्राम, मनोज धोंगडे, उत्कर्ष गायकवाड, धनराज उमरे, अमोल बच्चलवार, आकाश नळे, आशिष करमनकर, आदर्श तेलंग, आकाश वाटेकर, सूरज निरांजने, प्रणाल करमनकर, आनंदराव देठे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.#Classes

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने