(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मुल तालुक्यातील चीचपली वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या दहेगाव बितातिल कक्ष क्रमांक ५१७ येथे एकाच वाघाने एकाच दमात मोठ्या चार म्हैस व एक हल्या असे एकूण पाच जनावर एकाच वेळी ठार केले आहे. यात गंगाधर बिजराम वेलादी उथळपेठ यांची मोठी नुकसान झाली असून एकाच व्यक्तीचे सर्व जनावरे ठार केल्याने बीचाऱ्याच गोटा च रिकामा केला अश्या शब्दात गावात हळहळ होत आहे. #Death #tigerattack
तरी वन विभागांनी पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. #Adharnewsnetwork
काल अचानक वाट चुकून सगळे जनावरे गायब झालीत गावात व परिसरात शोध घेतला मात्र त्यांचा कुठेच पता लागला नाही. रात्र जागून काठली सगळी जनावरे गायब झाल्याने मोठी धडकी होती शेवटी दिवस उजाडताच काही नागरिकांना घेऊन जंगल गाठले तर सर्व जनावरे एकाच ठिकाणी वाघाने ठार केल्याचे दिसून आले. याची माहिती वन विभागास मिळताच वनविभागाची चमू घटना स्थळ गाठून पंचनामा केले असता त्यांना सर्व गुरांना वाघाने ठार केल्याचे दिसून आले.
एकाच गोठ्यात सदर गुरांचा वास्तव्य असल्याने जिव्हाळ्याने मशी कळपाने होते त्यामुळे प्रहार करताना एकाच वाघाने पाळी पाळीने त्यांना ठार केले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. यात त्यांचे अंदाजे तीन लाखाचे वर नुकसान झालेले असून एकाच वेळी सर्व गुरांना ठार केल्याने गंगाधर वेलादि यांचे गोठ्ठाच रिकामा झालेला आहे. विशेष म्हणजे सदर म्हैसे व हल्या हे एकाच्याच मालकीचे होते तर त्यातील चारही माशी ह्या गाभण होत्या त्यामुळे काही दिवसातच त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळणार होते अश्यातच वाघाने सर्व गुरे ठार केल्याने त्याचे परिवाराचे उदर निर्वाहावर मोठे संकट कोसळले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत