Top News

ग्राहक पंचायत भद्रावती यांच्याकड़े एकाच दिवशी तब्बल ८४ ग्राहकांच्या तक्रारी दाखल. #Complaints



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती : ग्राहक पंचायत भद्रावती यांचे कड़े सहारा इंडिया आणि स्टार मल्टीपरपज सोसायटी यांच्या विरोधात दिनांक १६ जुलै ला तब्बल ८४ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे.
सहारा इंडिया आणि स्टार मल्टीपरपज सोसायटी यांच्याकडे भद्रावती शहरातील ब-याच लोकांनी आर.डी., फिक्स डिपॉजिट स्कीम अंतर्गत लाखो रूपयांची गुंतवणुक केली होती. ऑर्डनेंस फॅक्टरी, डब्ल्यू सी एल, शिक्षक वर्ग, दुकानदार अशा ब-याच लोकांनी सेवा निवृत्ती नंतर मिळालेल्या पैश्याची सहारा इंडिया आणि स्टार मल्टीपरपज सोसायटी या कंपनीमध्ये गुंतवणुक केली होती.
परंतु आर.डी., फिक्स डिपॉजिट परिपक्व होऊन बराचं काळ लोटला तरी लोकांचे पैसे परत करण्यासाठी सहारा इंडिया आणि स्टार मल्टीपरपज सोसायटी टाळाटाळ करत आहे.

ग्राहकाच्या जवळचा व्यक्ति कंपनी चा एजेंट असल्या कारणाने एजेंट वर विश्वास ठेवत लोकांनी आपली सर्व कमाई कंपनीच्या एजेंटच्या हाती दिली. परंतु कंपनी कडुन पैसे मिळत नसल्यामुळे एजेंट आणि ग्राहक दोन्ही ही त्रासले आहे.

आयुष्याची सर्व कमाई कंपनीकडे जमा आहे. मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, अतिआवश्यक अशा दवाखान्याचा खर्च याच्यासाठी विणवनी करून पण कंपनी कडुन कोणतीही मदत केली नाही. ब-याच लोकांनी आयुष्य भराची संपुर्ण कमाई कंपनीत अडकल्यामुळे झोप उडाली आहे.

गुंतवणुक दारांनी वारंवार भद्रावती येथील शाखा प्रबंधक संजय कुमार यांना भेटुन विणवनी केली, पण त्यानी ग्राहकांना फक्त तारिख पे तारीख दिली.
त्यामुळे भद्रावती येथील कंपनीच्या ग्राहकांनी ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या कड़े सहारा इंडिया आणि स्टार मल्टीपरपज सोसायटी यांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

एकाचं दिवशी ८४ तक्रार आल्या आहे. हे ग्राहक पंचायत भद्रावतीच्या आजवरच्या काळातील ऐतिहासिक दिवस आहे. यावरून ग्राहकांमध्ये त्यांच्या ग्राहक हक्काची आता जाणीव होतांना दिसत आहे. याचे सर्व योगदान हे ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या टिमचे आहे.
वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, अशोक शेंडे, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे, शेखर घुमे, उत्तम घोसरे यांनी ग्राहक हक्कासाठी २६ जानेवारी १९८९ पासुन लढा दिला आहे आणि समोर पण यांचे सहकार्य राहणार. अशी माहिती ग्राहक पंचायत भद्रावतीचे सह सचिव प्रविन चिमुरकर यांनी दिली.
ग्राहकांनी नेहमी सर्तक राहुन वस्तु खरेदी करावी. बिल, गॅरंटी कार्ड आणि अन्य संबंधित कागदपत्राची दुकानदारांना मागणी करावी. कागदपत्र सांभाळुन ठेवावे आणि काही तक्रारी असल्यास ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या सोबत संपर्क करा. असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी केले आहे. #Complaints

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने