अभाविपची भद्रावती नूतन नगर कार्यकारणी घोषित. #ABVP



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची महत्वपूर्ण बैठक येथील लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात पार पाडून त्यात भद्रावती नगराची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी संघटना असून गेल्या ७२ वर्षांपासून शैक्षणिक परिवार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यावर्षी भद्रावती नगरात नूतन अभाविप नगर कार्यकारिणी गठीत करण्यात आली. 


यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळुन छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. स्वामी विवेकानंद व देवी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अभाविप उद्बोधन पोम्पटीवार सर यांनी केले व विनोद पांढरे सर यांनी मार्गदर्शन केले व निवडणूक अधिकारी म्हणून अध्यक्ष प्रा. नितीन लांजेवार यांची घोषणा केली. अध्यक्ष प्रा.नितीन लांजेवार यांनी पुढिल प्रकारे नूतन कार्यकारिणी घोषित केली. नगरमंत्री म्हणून बाळा प्रशांत भडगरे, नगर सहमंत्री यश चौधरी आणी तनुजा येरने, महाविद्यालय प्रमुख साहिल नक्षीने,महाविद्यालय सहप्रमुख प्रथम पतरंगे, कार्यालय मंत्री कुणाल केवटे, सह कार्यालय मंत्री राधेय ताठे, सेवाकार्य प्रमुख(SFS) तन्मय भदभुजे, सेवाकार्य सहप्रमुख(SFS) गोपाल पारधे,कोष प्रमुख कुणाल पारधे, सहकोष प्रमुख राहूल मुजुमदार, विकासार्थ विद्यार्थी (SFD) प्रमुख पवन चौखे, विकासार्थ विद्यार्थी (SFD) सहप्रमुख लक्षमण आडे,तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य (TSVK) प्रमुख चंद्रकांत झाडे,TSVK सहप्रमुख अनुराग शंबरकर, कलामंच प्रमुख पायल सागुळले, कलामंच सहप्रमुख भाग्यश्री प्रशांत भडगरे, सोशल मिडिया प्रमुख मोहम्मद कैफ नसुरुदीन खान, मिडिया सहप्रमुख आकाश राखूनडे,आंदोलन प्रमुख अर्जुन प्रसाद,आंदोलन सहप्रमुख संस्कार झाडे,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख रोहित गणेश शेट्टी, कनिष्ठ महाविद्यालय सहप्रमुख लालित नागपुरे, स्वाध्याय मंडळ प्रमुख सुब्रत रांगारी,स्वाध्याय मंडळ सहप्रमुख प्रियांशू मस्के, खेळ मंत्री रोहित सुब्रम्हण्यम शेट्टी, खेळ सहमंत्री मयुर प्रशांत भडगरे, जनजाती कार्य प्रमुख दर्शना नागपुरे, विद्यार्थीनी प्रमुख सेजल चिडे, विद्यार्थीनी सहप्रमुख निवेदिता मुजुमदार, प्रसिध्दी प्रमुख फिलेमोन दासरी आणी सदस्य म्हणून निहाल आप्रेटवार, शिवानी बिंजवे आणी मानव साव यांची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणी आभार बाळा प्रशांत भडगरे यांनी मानले,संचालन तनुजा येरने यांनी केले तर दर्शना नागपुरे ने 'छात्र शक्ती भारत की शान' हे गीत घेतले. नूतन कार्यकारिणीचे शैक्षणिक, सामाजिक सर्व क्षेत्रातून स्वागत व अभिनंदन होत आहे. #ABVP

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने