पोंभुर्णा:- दि. 4 ऑगस्टला 5 वाजताच्या सुमारास कु. अवनी सुनिल खोबरे (वय 5 वर्ष) हि रस्त्याच्या कडेला असलेल्या नळावर पाण्याचा पाईप धरुन असताना स्काॅर्पिओ MH 49 U 7683 या वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अवनी या मुलीला धडक मारुन जखमी केले. तिला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले असता ति उपचारा दरम्यान मृत्यू झाला. #Accident
अवनी च्या आईच्या रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन पोंभुर्णा येथे वाहन चालकावर 279, 337, 304 (अ) भादवी 184 मोवाका अन्वय गुन्हा दाखल करुन पुढील तपास PS ओल्लालवार करीत आहे.